गुढीपाडवा व ईद निमित्त बोधात्मक रांगोळी स्पर्धेतील यश

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे गुढीपाडवा आणि ईद निमित्त बोधात्मक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सणांचे सांस्कृतिक महत्त्व रांगोळीच्या सौंदर्यातून उलगडले. या स्पर्धेमध्ये इयत्ता 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गुढीपाडव्याचे स्वागत, हिंदू-मुस्लिम ऐक्य, यासारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी रंगसंगतीच्या सहाय्याने सुंदर कलाकृती साकारल्या. कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे मूल्यमापन करून विजेत्यांची निवड केली. त्यात कु. बेंबडे योगिता माधव प्रथम, कु.श्रीमंगले श्रद्धा भीमराव द्वितीय, कु. श्रीमंगले सृष्टी मारोती वर्ग तृतीय तर कु.पठाण निदा अहमद उत्तेजनार्थ असे यश विद्यार्थ्यांनी मिळविले आहे. ही स्पर्धा व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. या यशस्वी उपक्रमासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. गोविंदरावजी केंद्रे, संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, व शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.