आर्थिक बळकटीसाठी महिला सक्षमीकरण आवश्यक – राहुल कुमार मीना

लातूर (एल.पी.उगीले) : जिल्हास्तरीय उमेद महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व समुदाय संसाधन महिलांच्या क्षमता बांधणी कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे जगन्नाथ मंगल कार्यालय लातूर येथे आयोजन करण्यात आले होते.
समाजाची प्रगती होण्यासाठी महिलांची प्रगती महत्त्वाची असून देशाच्या आर्थिक बळकटीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे, ते सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून सुरू आहे. असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी आयोजित कार्यशाळेस उपस्थित महिलांना संबोधित करताना केले.
सर 2024-25 या वर्षात अभियानात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल जिल्ह्यातील 10 तालुक्यातील सी आर पी, कृषी सखी, पशू सखी, सी टी सी, आर्थिक साक्षरता सखी, बँक सखी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिस्ती पत्रक देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे बायर सेलर मिट चे आयोजन करण्यात आले होते . या मिट मध्ये ठेव्यात आलेल्या विविध उत्पादनांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाहणी करून उत्पादन विषयी महिलांकडून माहिती जाणून घेतली, व उत्पादक महीलाशी संवाद साधून उत्पादनाचे कौतुक केले. प्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी अभियानचे पुढील आर्थिक वर्षाचे कामकाज नियोजन, याबद्दल सर्व उपस्थित समूह संसाधन महिलाना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून उपस्थित सर्व महिलांना संबोधित केले. प्रसंगी उत्कृष्ठ कार्य केलेल्या अभियानातील कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक वैभव गुराले, अल्ताफ जिकरे, भगवान कोरे पांडुरंग जेटनवरे, व्यंकट जाधव,तानाजी सोळंके यांनी केले. सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक तसेच प्रशासन लेख सहाय्यक यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन तालुका अभियान व्यवस्थापक श्रीकांत श्रीमांगले यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व समूह संसाधन महिला मोठा संख्येने उपस्थित होत्या.