वर्षाराणी मुस्कावाड प्रतिभावंत साहित्यिक पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले)
प्रसिद्ध साहित्यिका तथा शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील सहशिक्षिका वर्षाराणी ज्ञानोबा मुस्कावाड यांना प्रतिभावंत साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील वर्षाराणी मुस्कावाड यांचे योगदान याचा आढावा घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद धुळे जिल्हा समुह यांनी या पुरस्कारासाठी साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांची निवड केली.
पुरस्काराचे वितरण करताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाखा धुळे जिल्हा समुह अध्यक्षा वृंदा दीपक राव म्हणाल्या, तुमच्यामध्ये लिहिण्याचे जसे सामर्थ्य आहे, तशाच पद्धतीने नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याची क्षमताही आहे.
स्वतःची वैयक्तिक कामे बाजूला ठेवून अव्याहत एखाद्या ध्येयाला, सेवा कार्याला, वाहून घेणे ही एक महान साधना व तपश्चर्या असते.शिक्षिका म्हणून आपल्यामध्ये प्रगल्भता आहे त्यामुळे आपण रचलेली साहित्यकृती ही केवळ मराठवाड्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र मध्ये नावाजली जाते आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आपण लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील असून देखील आज संपूर्ण महाराष्ट्राला आपली ओळख होते आहे हे निश्चितच अभिनंदन ही आहे या शब्दात त्यांनी कौतुक केले.
प्रतिभावंत साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, धनंजय गुडसूरकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, प्रा. कुमार बंडे, प्रा धनराज बंडे, मुस्कावाड राजेंद्र भोसले, प्रसिद्ध साहित्यिका अनिता येलमटे, अंबिका पारसेवार, नीता मोरे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.