सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी

0
सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी

रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिलवान यांचे सुपुत्र) यांनी स्पीच थेरपी आणि स्वॅलॉइंग डिफिकल्टीज या विषयात त्यांनी PhD पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. उझैर यांनी स्ट्रोकनंतरचे रुग्ण, मुलांमधील भाषण विकासातील विलंब, बोलू न शकणारे रुग्ण तसेच घशाच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर गिळण्यास अडचण येणाऱ्या रुग्णांवर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची National Speech Therapist of the Year म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान सोहळा दिल्ली येथे पार पडला.या यशाबद्दल घुमटकर ग्रुप परिवारातर्फे उझैर चिलवान यांचे व त्यांचे वडील डॉ. आदिल महमूद चिलवान यांचेही
अभिनंदन करण्यात आले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे.त्यांना यश, आरोग्य आणि समाजसेवेची संधी मिळो अशा घुमटकर ग्रुपच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!