क्रीडा गुणांसाठी 11 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

0
क्रीडा गुणांसाठी 11 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

लातूर (एल.पी.उगीले) : शासन निर्णयानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी ) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. यासाठीचे ऑनलाईन प्रस्ताव 11 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून क्रीडा प्रस्ताव दरवर्षी विभागीय मंडळाकडे 30 एप्रिल पर्यंत सादर केले जातात. तथापि, शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) या परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर आयोजित करण्यात आल्या असून या परीक्षेचा निकाल 15 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने जाहीर करावयाचा आहे.त्यामुळे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत विभागीय मंडळाकडे 15 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत. तरी सर्व मुख्यध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी यांनी त्यानुषंगाने 11 एप्रिल,2025 पर्यंत आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून प्रस्ताव भरून घ्यावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!