डॉ.किरण गोरे (जाधव) यांचा सत्कार संपन्न.

उदगीर (एल.पी.उगीले)
प्रा.आ.केंद्र देवर्जन येथे वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या डॉ.किरण गोरे (जाधव) यांचा सत्कार सोहळा प्रा.आ.केंद्रच्या वतीने आयोजित करण्यात आला.
उच्चशिक्षण घेण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.
येथे कान,नाक,घसा तज्ञ होण्यासाठी पदवीत्त्युर पदवी करिता त्यांची निवड झाली आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
२ ऑगस्ट१९ पासून आज पर्यंतच्या कालावधीत प्रा. आ.केंद्राची प्रभारी वैद्यकीय अधिकारी पद सांभाळत त्यांनी आरोग्य विभागातील जिल्हा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळवुन देण्यास त्यांचा पुढाकार राहीला आहे. त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत चोख पणे पार पाडली.
कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय , उल्लेखनीय कार्य असणाऱ्या, ग्रामस्थ, अधिकारी ,कर्मचारी, आशासेविका या सर्वांशी समतोल राखून काम करणाऱ्या महिला अधिकारी म्हणुन त्यांची ओळख जिल्हा स्तरावर आहे.
या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन राठोड , सरपंच अभिजीत साकोळकर, डॉ. तिरुपती शेळके, गावचे पोलिस पाटील बस्वराज रोडगे, ग्रामपंचायत सदस्य, तसेच सर्व सी.एच.ओ., कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. आ. केंद्र देवर्जन सर्व कर्मचारांनी हृदयपूर्वक सत्कार करून निरोप दिला. त्याबद्दल डॉ. किरण गोरे परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.