शास्त्री विद्यालयात बस्वराज उप्परबावडे यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात सत्कारमूर्ती बस्वराज सिद्धाप्पा उप्परबावडे यांनी विद्यालयामध्ये सेवक म्हणून उत्कृष्ट कार्य करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल सेवा गौरव समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकराव लासुणे, व्यंकटराव गुरमे, मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, पर्यवेक्षक किरण नेमट, अंकुश मिरगुडे, श्रीपाद सिमंतकर, बसवराज स्वामी ,ओंकार गांजुरे, शिवाजी स्वामी ,पांडुरंग दोडके, प्रवीण उप्परबावडे, शिवानी उप्परबावडे उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षकांनी मनोगत मांडले. रागिणी बर्दापूरकर यांनी त्यांच्या जीवनकार्याचा व त्यांनी केलेल्या एकूण सेवेचा उल्लेख केला .
शोभा नेत्रगावकर यांनी आपल्या मनोगतून उपरबावडे हे खूप कष्टाळू, सतत कार्यतत्पर ,नम्रता हा गुण, अतिशय शांत स्वभाव आज त्यांचा सेवा गौरव समारंभ आहे. त्यांना चांगले आरोग्य आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या .
त्यानंतर त्यांचा मुलगा प्रवीण उप्परबावडे यांनी आपल्या मनोगतून वडिलांचे कष्ट, वडिलांनी केलेले संस्कार यामुळेच आम्ही घडलो,असे विचार व्यक्त केले.
यानंतर अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात सत्कारमूर्ती बस्वराज सिद्धप्पा उप्परबावडे यांनी शाळेच्या अनेक आठवणींना उजाळा दिला .
मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांनी आपल्या मनोगतातून उप्परबावडे हे शिस्तप्रिय, प्रेमळ ,मुलांचे लाडके मामा, त्यांच्यातील संस्कार ,प्रेमाने बोलणे अशा स्वभावाच्या व्यक्ती कायम स्मरणात राहतात, असे वक्तव्य केले .
अध्यक्षीय समारोपात सतनप्पा हुरदळे यांनी सेवक शाळेचे आधारस्तंभ असतात, शाळेची संपूर्ण माहिती असलेला व्यक्ती म्हणजे बस्वराज मामा अत्यंत शांत स्वभाव असलेले सेवानिवृत्त होत आहेत. या प्रसंगी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत, परिचय विजया गोविंदवाड यांनी केले तर प्रास्ताविक प्रमोदिनी रेड्डी व आभार संदीप बोधनकर यांनी मानले.