भाऊसाहेब सहकारी बँकेस १ कोटी निव्वळ नफा

उदगीर (एल.पी.उगीले) बँकींग
क्षेत्रात उत्तमप्रकारे,दर्जेदार सेवा देणाऱ्या भाऊसाहेब सहकारी अर्बन बँक लि.उदगीरने आपला मार्च २०२५ अखेर प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. आर्थिक वर्षाअखेर १ कोटी निव्वळ नफा व ०.३१ टक्के नेट एनपीए झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील
तळेगावकर व बँकेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी दिली. बँकेच्या एकूण ठेवी १०२.७१ कोटी व कर्जे ६६.२४ कोटी असल्याचेही तळेगावकर
यांनी यावेळी सांगितले.
२०२५ – २६ मध्ये बँकेचे कार्यक्षेत्र वाढवून शाखा विस्तार करण्याचा मानस असून बँकेच्या ठेवी २०० कोटी करण्याचाही निर्धार यावेळी तळेगावकर यांनी व्यक्त केला. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मार्गदर्शन, सुचना व सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून भाऊसाहेब सहकारी बँकेने अतिशय प्रेरणादायी वाटचाल करीत असून या वर्षात बँकेस मिळालेल्या यशाचा आपणास अतिशय आनंद होत आहे.बँकेच्या या यशस्वी वाटचालीत बँकेचे संचालक,
सभासद, ग्राहक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत कुलकर्णी,जनरल मॅनेजर शिवाजी पाटील,बँकेचे कर्मचारी, बँकेचे सर्व
खातेदार व हितचिंतक या सर्वांचा सहभाग असल्याचे बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील तळेगावकर यांनी
यावेळी सांगितले.