ओम हॉस्पिटल तर्फे रामनवमीनिमित्त महाआरती व प्रसादाचे आयोजन

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर येथील नवा मोंढा भागात असलेल्या डॉ. शरद तेलगाने यांच्या ओम हॉस्पिटल तर्फे उदगीर येथील राम मंदिर जळकोट रोड येथे रामनवमीच्या निमित्ताने “संगीत भजन”, महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उदगीर येथील ख्यातनाम संगीत तज्ञ गोपाळराव जोशी आणि त्यांचा संच उपस्थित होता. तसेच ह भ प उद्धव महाराज हैबतपुरे, प्रवचनकार जगताप गुरुजी, मोहनराव खिंडीवाले, गोविंदराव जगताप, परमेश्वर मोरे, सुरज बिरादार, सुनील गुणाजी, प्रवीण बिरादार, पुजारी ऋषिकेश महाराज इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगीत भजन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या भाविक भक्तांनी महाआरती आणि प्रसादाचाही लाभ घेतला.
उपस्थित सर्व रामभक्तांसाठी डॉ. शरद कुमार तेलगाने यांच्या ओम हॉस्पिटल तर्फे सर्व सुविधा करण्यात आली होती. डॉक्टर शरद कुमार तेलगाने हे स्वतः प्रबोधनात्मक कीर्तनकार असल्याने असे आध्यात्मिक कार्यक्रम ते नेहमी आयोजित करतात. अत्यंत देखणा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल परिसरातील भाविकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.