होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत संत ज्ञानेश्वर माऊली प्रा.विद्यालयाचे घवघवीत यश

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साधेल अशा पद्धतीचे कार्य करण्यासाठी जणू विविध शाळेत आता स्पर्धा लागली आहे. उदगीर येथील संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मुंबई येथे रजत पदक घेऊन पहिल्या पाच विद्यार्थ्यात आपले नाव चमकवणारा विद्यार्थी कु.श्रीशैल्य सुवर्णा शरद मोरे तसेच एमटीएस परीक्षेत राज्यातून सहावा येणारा कु. गौरव सुवर्णा दयानंद देवणे व होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी द्वितीय अटेम्प्ट क्वालिफाईड होणारी कु.श्रेया कल्पना संतोष बिरादार या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष गोविंद निटूरे, मुख्याध्यापिका सौ. जगताप अनिता,खुळे उषाकिरण, मेटकर सुरेखा, वट्टमवार कपिल, जाधव गुंडेराव, कुलकर्णी श्याम, बिरादार डी एस यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक शाळा ही मराठी सेमी माध्यमाची उदगीर नगरीतील एक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. या शाळेचे अनेक विद्यार्थी आपले नाव राज्य पातळीपर्यंत घेऊन जात आहेत. त्याबद्दल गुणवंताचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.