उदगीर येथे ऐतिहासिक श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या मूळ शिवलिंगाचा दर्शन सोहळा

उदगीर (एल.पी.उगीले) येथील दि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने देशातील प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या अत्यंत प्रभावी व ऐतिहासिक श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या मूळ शिवलिंगाचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अकराव्या शतकात जेंव्हा सोमनाथ मंदिर पूर्णत: नष्ट केले गेले, त्यावेळी तेथील शिवलिंगाच्या पवित्र अवशेषांना कांही अग्निहोत्री पुजाऱ्यांनी वाचवले आणि पिढ्यान पिढ्या त्याचा सांभाळ केला. जवळपास एक हजार वर्ष हे अवशेष कर्नाटकमध्ये गुप्त ठिकाणी काही भक्तांनी जतन करून ठेवले.
पुढे चालून श्री शंकराचार्य यांच्या सूचनेनुसार बेंगलोर येथील द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी म्हणजेच गुरुदेव यांच्याकडे त्या शिवलिंगाचा सांभाळ करणार्या प्राचीन पुजारी पुरोहित यांच्या वंशजानी ते हस्तांतरित केले.
बेंगलोर येथे आश्रमात महाशिवरात्री च्या भव्य सोहळ्यामध्ये गुरुजींना हस्तांतरित केलेल्या शिवलिंगावर अभिषेक झाला. हेच पवित्र शिवलिंग दर्शनासाठी उदगीरमध्ये आणले जात आहेत.
दर्शन सोहळ्याचे आयोजन उदगीर येथील श्री हावगीस्वामी मठ संस्थान याठिकाणी रविवार दि. १३ एप्रिल २०२५ रोजी स. ११ ते सायं. ६ यावेळेत करण्यात आले आहे.
भाविक भक्तांनी या पावन शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, उदगीरच्या वतीने करण्यात आले आहे.