अक्कमहादेवी जयंतीचे शनिवारी आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) वीरशैव समाज उदगीरच्या वतीने
वीरवैराग्य निधि अक्कमहादेवी जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वीरशैव समाज उदगीरच्या वतीने शनिवार दि.१२ एप्रिल २०२५ रोजी शिवशंकर नागुरे मंगल कार्यालयात वीरवैराग्य निधि अक्कमहादेवी जयंतीनिमित्त दु. १२ वा.प्रार्थना, पूजा व पाळणा कार्यक्रम होणार आहे.यावेळी शरणी महादेवी श्रीमंडळे व शांताबाई देशमुख यांचे व्याख्यान होणार असून कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी उत्तरा कलबुर्गे या राहणार आहेत.कार्यक्रमास श्रीमती लक्ष्मीबाई पांढरे,सरोजनी डांगे, रेखा कानमंदे,गुणवंती मिठारे, चंद्रकला स्वामी, कांता बुळ्ळा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सद्भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन वीरशैव समाज, कार्यकारिणी मंडळाने केले आहे.