ज्ञान संग्रह करण्याचे प्रभावी साधन म्हणजे वाचन होय – अर्चना पैके

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना प्रसिद्ध वक्त्या अर्चना पैके म्हणाला, ज्ञान संग्रह करण्याचे प्रभावी साधन म्हणजे वाचन होय.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध वक्त्या अर्चना पैके, सिद्धेश्वर पैके, प्रा. सीमा मेहत्रे, प्रा. नितीन पाटील, शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड हे उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
पूढे बोलताना अर्चना पैके म्हणाल्या, आधुनिक भारतातील क्रियाशील समाजसुधारक म्हणून महात्मा जोतिबा फुले यांना ओळखले जाते. ज्ञान ही एक शक्ती आहे ,अशी श्रद्धा ज्योतिबांची होती. जोपर्यंत देशातील प्रत्येक मूल जातीच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही, आणि देशातील महिलांना समाजातील प्रत्येक क्षेत्रात समान हक्क मिळणार नाहीत. तोपर्यंत देश आणि समाजाची खरी प्रगती होऊ शकत नाही.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, सर्वच विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन चरित्र व त्यांचे साहित्य याचे वाचन करावे व आपले जीवन समृद्ध करुन घ्यावे.
विद्यालयातील वृक्षांचे संगोपन करणारे विद्यार्थी विक्रांत स्वामी, ओमकार जवळगे, आर्यन हटकर, नितेश भालेराव यांचा पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड हे विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान, वृक्षारोपण, शिस्त, संचलन यात सहभागी करुन घेतात व त्यांना मार्गदर्शन करतात. त्याबद्दल त्यांचा गौरव महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य वसंत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा अल्प परिचय एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार प्रा. नितीन पाटील यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, विजय कावळे, सुधीर गायकवाड, शिवकुमार कोळ्ळे, विभाग प्रमुख विलास शिंदे यांनी सहकार्य केले.