20 एप्रिल ते 26 एप्रिल श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर नाम, जप, यज्ञ सोहळा

उदगीर (एल.पी.उगीले)
अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित श्रीस्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र मुख्य(दरबार) श्रीरामचंद्र नगर, नांदेड रोड महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे, उदगीर या केंद्रात प्रतिवर्षाप्रमाणेही याही वर्षी दिनांक 20 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरुपुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7:00 वाजता शोडषोपचार पूजा, सकाळी 8:00 वाजता भूपाळी आरती, सकाळी 8:10 वाजता नित्य स्वाहाकार,सकाळी 10:30 वाजता नैवेद्य आरती व मार्गदर्शन सकाळी 10:45 वाजता विशेष याग,सायंकाळी 4:00वाजता श्री दुर्गा सप्तशती व श्री स्वामी चरित्र सारामृत ,श्री रुद्र पाठ, सायंकाळी 5:30 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, संध्याकाळी 6:30 वाजता नैवेद्य आरती, संध्याकाळी 7:00 वाजता नित्य ध्यान यासह शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 ग्रामदेवता मानसन्मान, मंडळ मांडणी. दिनांक 20 एप्रिल 2025 मंडळ स्थापना अग्नी स्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार व याच दिवशी 4:30 गोपाळ जोशी व त्यांचा संच श्री दत्त पंचपदी कार्यक्रम. सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 नित्य स्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग.मंगळवार दिनांक 22 एप्रिल 2025 नित्य स्वाहाकार चंडियाग. बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 नित्य स्वाहाकार स्वामी याग. गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 नित्य स्वाहाकार, गीताईयाग.शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 नित्य स्वाहाकार ,रुद्र याग ,मल्हारी याग. शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 नित्य स्वाहाकार बली पूर्णा हुती, श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन व अखंड नाम,जप, यज्ञ सप्ताहाचा समारोह महानैवघ आरती इ. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच रक्तदान शिबिर,वृक्षारोपण, फळे वाटप, शालेय साहित्य वाटप इ कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाच्या उदगीर ,जळकोट देवणी परिसरातील भावीक- भक्त वेकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन समर्थ सेवकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 82 0 81 42 173 ,98 22 50 66 0 7,96 57 43 25 86 ,98 81 316 721, 91 46 56 81 65.