अंबिका कॉलनी येथे महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0
अंबिका कॉलनी येथे महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अंबिका कॉलनी सोमनाथपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक मसगले आप्पा कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर प्रमुख पाहुणे उपसरपंच अमित माडे व माजी सरपंच राम सूर्यवंशी हे होते.याप्रसंगी व्यासपीठावर संग्राम सोमवंशी, प्रा.जोंधळे या मान्यवरांच्या हस्ते, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले, तसेच कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक महिला, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
जयसिंग कोकाटे, विजयकुमार सोनकांबळे, पद्माकर गुडसुरकर ,अमित तिगोटे, बुद्धभूषण बानाटे, प्रा.प्रशांत कांबळे, प्रा.कमलाकर मानकरी, अशोक बेंबळगे, बेंबडे , संगम अष्टेकर, चेतन मानकरी, गजानन गव्हाणे, नंदकुमार येलदरे, चौधरी साहेब, स्वामी साहेब, मीनाताई माडे, सुरेखा लांडगे, अश्विनी कोकाटे, पूजा बर्गे, कांता बर्गे, पंचशिलाताई तिगोटे, सोनकांबळे ताई, मानकरी ताई ,डॉ.रजनी जयसिंगराव कोकाटे, गुडसूरकर, सौ.निला गायकवाड, सुमित गायकवाड हे कार्यक्रमास उपस्थित होते.या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.कुमारी वेदिका राजकुमार कोळे या विद्यार्थिनीने खेळामध्ये राज्यस्तरीय पातळीवर जाऊन ओडिसा इथपर्यंत ती खेळली त्याबद्दल तिला पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले; तर दुसरा गुणवंत विद्यार्थी अंशू पद्माकर गुडसुरकर या विद्यार्थ्यांनी सुद्धा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेऊन प्राविण्य मिळाल्याबद्दल यावेळी त्याचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रो.डॉ.सुरेश लांडगे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!