समर्थ कोचिंग क्लासेसच्या गुणवंतांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले):- येथे समर्थ कोचिंग क्लासेस च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन समर्थ कोचिंग क्लासेसचे संचालक नागनाथ गुट्टे यांनी आयोजित केले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.बिभिषण मद्देवाड व प्रमुख पाहुणे मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषाताई कुलकर्णी उस्तुरे व शिक्षक सदाशिव गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे क्लासेसच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक नागनाथ गुट्टे यांनी केले. प्रमुख पाहुणे उषाताई कुलकर्णी उस्तुरे व सदाशिव गुट्टे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले .तर अध्यक्ष प्रा. बिभिषण मद्देवाड यांनी अध्यक्षीय समारोप करत पालकांनी इमारती व देखाव्याच्या बळी न पडता गुणवत्तेनुसार क्लासेसची निवड करण्याचे मार्गदर्शन केले.
श्रेया परीक्षेतील राज्यातील प्रथम सहा गुणवंत विद्यार्थी आरुष विठ्ठल धुळगंडे 90 गुण, रुद्राक्ष चंद्रकांत बिरादार 90 गुण, आराध्या विजयकुमार पताळे 272 गुण, माणीकराज श्रीरंग अडगुळवाड 256 गुण, गणेश तुकाराम मुंढे, वेदिका संगमेश्वर विरकपाळे 244 गुण घेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल क्लासेसच्या वतीने पॅड, गोल्ड मेडल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला.तसेच क्लासेसच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथमसत्र व द्वितीय सत्र परीक्षेतील प्रथम क्रमांक आरुष धुळगंडे,मन्मथ लांडगे,आर्यन रोटेवाड,गणेश मुंढे ,रुद्रप्रताप ढगे,सोहम कांबळे,पुजा चोले ,साई समगे तर द्वितीय क्रमांक श्रावणी अडगुळवाड,अजिंक्य केंद्रे, यज्ञेश पताळे,अक्षता काळे,आरोही समगे,सुमित बिरादार, आदित्य मुंढे, आरती केंद्रे या सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व सिल्वर मेडल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे संचालीका सुवर्णा गुट्टे यांनी आभिनंदन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.हर्षदा गुट्टे यांनी केले.