सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीरच्या वतीने बक्षीस वितरण संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती, उदगीर 2025 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय,उदगीर या ठिकाणी घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व उदगीर जळकोट मतदार संघाचे आ. संजयभाऊ बनसोडे, विनोद कपाळे, धनाजी मुळे, बालाजी भोसले, वसंत पाटील, सय्यद जानीमिया शेख, बिपिन पाटील, बाळासाहेब पाटोदे, ऍड. वर्षाताई पंकज कांबळे, प्रेरणाताई गायकवाड, परमेश्वर मोरे, प्रशांत बिरादार मांजरेकर, सचिन पाटील मांजरेकरयांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी आशाताई बेंजरगे,साधू भाऊ लोणीकर, कनिष्क शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जवळपास 600 विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी कार्य करत असलेली व एवढे मोठे बक्षीस वितरण करणारी पहिलीच वेळ आहे, यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर , सतीश पाटील मानकीकर ,मधुमती बिरादार, बाबासाहेब सूर्यवंशी ,पकोले शिवाजी रणजीत माळेगावे, प्रा. राहुल अतनुरे, डी एस बिरादार ,ज्ञानेश्वर बिरादार, विजय बामणीकर, गणेश मुंडकर, नामदेव सूर्यवंशी, अंकुशजी ताटपले पाटील, बालाजी नादरगे, पंकज कालाणी, अमोल पाटील, बामणे अंकुश,संतोष राठोड,राहुल बिरादार, नितीन बिरादार,परमेश्वर मोरे, गिरीधर पाटील,शंकर मोरे, प्रशांत रंगवळ, नितीन बिरादार, नारायण भोसले , प्रतीक पाटील, विशाल दांडगे, दिपक पाटील.गोपाळ पाटील डोरनालीकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्यातील शाळा व विद्यार्थी यांना व शिक्षक बांधव, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचा पण समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.