कर्नाटक शाळा शिक्षण विभाग नौकरसंघ कमालनगर तालुकाध्यक्षपदी सचिन शिंदे

उदगीर (एल.पी.उगीले)
नुकतीच कर्नाटक राज्य शालेय शिक्षण विभाग नौकरसंघ यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी तरुण, उत्कृष्ट वक्तृत्वशैली असणारे सचिन केशवराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली, तर प्रधान कार्यदर्शीपदी शांतकुमार गुडमे यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष दत्तात्रय मडीवाळ तर उपाध्यक्ष म्हणून सौ.विध्यावती सावळे यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून सौ.अनिता डांगे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नवनाथ यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकारी यांची निवड जिल्हाध्यक्ष सुरेश टाळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सरकारी व खाजगी अनुदानित शाळा, महाविद्यालय या सर्वांचा एकत्रित असा सर्वात मोठा नोकर संघ आहे. या कार्यकारिणीत सर्व तरुण असून आतिशय प्रामाणिक पणे काम करण्याचा व शिक्षकबंधुचे निरपेक्ष भावनेने काम करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. या निवड प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, सरकारी नोकर संघ कमालनगर तालुका अध्यक्ष सुनील कस्तुरे, राज्य परिषद सदस्य सुधारानी मॅडम, जिल्हा गौरव अध्यक्ष सदाफुले, जिल्हा कार्यदर्शी पांडुरंग तसेच सतीश सावळे, विवेकानंद ढगे तसेच बसवकल्याण ,चीटगुप्पा, भालकी, औराद इतर तालुक्यातील तालुकाध्यक्ष, प्रधान कार्यदर्शी आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षण व्यवस्थेतील मान्यवरा कडून कार्यकारणीचे अभिनंदन होत आहे.