सुनील महिंद्रकर यांच्या वाढदिवसानिमित्त पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वाटप

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील संगणक विभाग प्रमुख सुनील महिंद्रकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बाॅटलचे वाटप केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बसवराज पाटील नागराळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून रतिकांत अंबेसंगे, प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के हे उपस्थित होते.
संगणक निदेशक सुनील महिंद्रकर यांनी सैनिकी विद्यालयातील वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यांला पाण्याची बाॅटल देण्यासाठी घेऊन आले होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बाॅटलचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.