एलसीबीचा गुटखा विक्रेत्यांना पुन्हा झटका !!जप्त केला वाहनासह 8 लाख 12 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा !!

0
एलसीबीचा गुटखा विक्रेत्यांना पुन्हा झटका !!जप्त केला वाहनासह 8 लाख 12 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा !!
 लातूर ( ऍड. एल.पी.उगीले) 

नांदेड परिक्षेत्राला अत्यंत कर्तबगार असे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप आल्यापासून, या परिक्षेत्रात अवैध धंद्याला आळा बसू लागला आहे. भरीस भर म्हणजे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे देखील अशा अवैध धंद्याच्या विरोधात आहेत. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विचारासी एकरूप होत लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देखील जिल्ह्यातून अवैध धंदे हद्दपार करण्याचा प्रमाणिक प्रयत्न चालवला आहे. आत्तापर्यंत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. अशा पद्धतीने प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या समाजद्रोही प्रवृत्तीवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. सतत गुन्हे दाखल करून देखील काही लोक स्थानिक पोलिसांना चिरीमिरी देऊन लपून-छपून अवैद्य धंदे करतच आहेत. मात्र त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने करडी नजर ठेवली आहे.
याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आठ लाख 12 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि त्या गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरात येणारे वाहन जप्त केले आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीम राबवित येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी देवणी तालुक्यातील वलांडी गावाच्या शिवारातून वाहतूक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक 10/04/2025 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वलांडी गावाच्या शिवारात बोंबळी रोडवर सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 3 लाख 12 हजार रुपयांचा गुटखा व एक मारुती सुझुकी कंपनीची इको कार असा एकूण 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेला इसम नामे
बस्वराज विश्वनाथ आग्रे, (वय 44 वर्ष,रा.हालसी,ता. निलंगा जिल्हा लातूर) यांचे विरुद्ध पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास देवणी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे यांनी केली आहे.

चौकट……….
सर्रास कर्नाटकातून आयात चालू…….

लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू प्रामुख्याने कर्नाटक राज्यातून येत असते, हे जग जाहीर आहे. एक तर ही वाहतूक तोगरी मार्गे लातूर जिल्ह्यात किंवा औराद शहाजानी मार्गे लातूर जिल्ह्यामध्ये येतात, हे जगजाहीर आहे. असे असताना देखील तेथील स्थानिक पोलीस यासंदर्भात का सक्रिय होत नसतील? हा मोठा संशोधनाचा विषय आहे. देवनी पोलीस स्टेशन हद्दीतील तोगरी हे ठिकाण अवैध धंद्याचे माहेरघर बनते की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला कर्नाटकातून येणारा गुटखा तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक आंध्रातून येणारे जुगारी यांचा पहिला टप्पा हा तोगरी हद्दीतच असतो. इतके सारे जग जाहीर असतानाही कारवाई का नाही? हे नक्कीच नवलाईचे म्हणावे लागेल.

चौकट………..

औराद शहाजानीत देखील लाखोंचा गुटखा……

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयापासून बऱ्याच अंतरावर असलेले अडगळीचे पोलीस स्टेशन म्हणजे औराद शहाजानी होय या पोलीस स्टेशनला कर्नाटकाची सीमा असल्यामुळे कर्नाटकातून सहजपणे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतात या गोष्टीची कल्पना प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी पाटील यांना आल्यानंतर त्यांनी एक स्वतंत्र पथक तयार करून आवरा शहाजानी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या हलगरा पाटीवर छापा मारून तीन लाख 63 हजारांचा गुटखा जप्त केला आहे याबाबत आवरण शहाजानी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून एकास अटक ही करण्यात आली आहे. वास्तविक पाहता नव्याने आलेल्या प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी राजश्री पाटील यांना जी गोष्ट समजते ही गोष्ट स्थानिक च्या पोलिस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना समजून येत नसेल का? की हात ओले करून हे लोक गप्प बसत असतील? या संदर्भातील तर्कवितर्क लावले जात आहेत.
हलगरा पाटी येथे टाकलेल्या छाप्यामध्ये घरासह हॉटेलमध्ये अनेक पोत्यात भरून ठेवलेला गुटखा या पथकाला आढळून आला. औरत शहाजानी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मटका, गुटखा सुसाट असून पोलीस प्रशासन मात्र गप्प असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र शासनाने हजारो कोटीचा कर बुडाला तरी हरकत नाही मात्र तरुणांना व्यसनाधीन होण्यापासून काही प्रमाणात तरी प्रतिबंधित करावे, कॅन्सर सारख्या भयानक रोगावर नियंत्रण करण्यासाठी गुटख्यासारखे पदार्थ निर्मिती, वाहतूक आणि विक्री यावर बंदी घातली आहे. असे असताना देखील शासनाच्या आदर्शवादी भूमिकेला कोलदांडा घालून स्थानिक पोलीस बिनधास्तपणे हप्ते खोरीच्या आहारी गेले आहेत की काय? अशा चर्चेला आता ऊत येऊ लागला आहे. त्या अनुषंगाने देखील विशेष लक्ष वरिष्ठ पातळी वरून घालणे गरजेचे आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!