लातूरातील 28 कॉफी शॉप मालकांवर कारवाई, गुप्त कॅबिन अडून नको ते धंदे?

0
लातूरातील 28 कॉफी शॉप मालकांवर कारवाई, गुप्त कॅबिन अडून नको ते धंदे?

लातूर (एल.पी.उगीले) शहरातील कॉफी शॉप किंवा रसवंती गृह थाटून स्वतंत्र वेगवेगळे कॅबिन बनवून प्रेमीयुगुलांच्या भेटीचे ठिकाण बनणाऱ्या किंवा लवर्स पॉईंट निर्माण करणाऱ्या काही दुकानांच्या विरोधामध्ये तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत लातूर पोलिसांनी शहरातील 28 कॉफी शॉप मालकावर कारवाई करून, कॉफी शॉप साठी नियमावली निर्माण केली आहे. सदरील नियमावलीचा भंग करणाऱ्या वर कठोर कारवाई केली जाईल अशी ही सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.कॉफी शॉप मालकांनी त्यांचे शॉपमध्ये बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करीत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांचे नेतृत्वात लातूर शहरातील चार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व त्यांचे पथकाने लातूर शहरातील विविध कॉफी शॉपवर अचानक भेट देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली आहे.
कारवाईत 28 कॉफी शॉपना भेटी देऊन त्यातील ३ कॉफी शॉप मधील बंदिस्त कंपार्टमेंट त्यांचे चालकामार्फत तोडण्यात आले. तसेच १० कॉपी शॉप चालक धारकांना भारतीय न्याय सुरक्षा संहिता 2023 कलम 168 प्रमाणे नोटीस बजाविण्यात आली आहे. ज्या आस्थापनाधारकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांचे परवाने रद्द करण्या साठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

कॉफी शॉप धारकांसाठी नियमावली

काही कॉफी शॉप धारक बेकायदेशीर पणे कॉफी शॉप चालवीत असल्याचे निदर्शनास आल्याने, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदरची बाब जिल्हाधिकारी लातूर यांचे निदर्शनास आणून त्यांनी दिनांक 20 जून 2023 रोजी पासून लातूर जिल्ह्यात कॉफी शॉप,हॉटेल धारकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.
काय आहे कॉफी शॉप, हॉटेल धारकांसाठी नियमावली- सीसीटीव्ही फुटेज असणे बंधनकारक आहे,सर्व दरवाजे पारदर्श काचेचे असावेत., बैठक व्यवस्था सर्व ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी असावी, अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट असू नयेत, सक्षम प्राधिकार्‍यासाठी भेट पुस्तिका ठेवलेली असावी,ध्वनी क्षेपक नियमांचे पालन करण्यात यावे,धूम्रपान करण्यास सक्त मनाई असावी,शासनाने दिलेल्या वेळेतच चालू ठेवता येतील.
वरील नियमांचे पालन न केल्यास कॉफी शॉप व हॉटेल धारका विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!