उदगीर मारवाडी युवा मंच अध्यक्षपदी गोविंद मूंदड़ा, सचिवपदी उमेश कालानी

उदगीर (एल.पी.उगीले) :- अखिल भारतीय मारवाड़ी युवा मंच शाखा उदगीर च्या 2025 ते 2027 या कार्यकाळासाठी होटल अरोमा गार्डन लॉन मध्ये झालेल्या युवा मंच च्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी गोविंद मूंदड़ा,उपाध्यक्ष साईराम बाहेती,सचिव उमेश कालानी,सहसचिव रोहित सोमानी,कोषाध्यक्ष अनूप बजाज, संयोजक लक्ष्मीकांत सोमानी तर ग्रुप ऑर्गनाइजर म्हणून अमर सारडा ची निवड करण्यात आली. या वेळेस उदगीर मंच चे मार्गदर्शक श्रीनिवास सोनी,रामबिलास नावंदर,विष्णुदास लोया,शिरीष नावंदर,दिनेश कालानी, पूर्व अध्यक्ष पवन मूंदड़ा,ऋषिकेश नावंदर सह नूतन पदाधिकारी उपस्थित होते.अध्यक्ष पदी गोविंद मुंदडा,सचिवपदी उमेश कालानी सह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे उदगीर तालुका माहेश्वरी सभा तर्फे अध्यक्ष श्रीनिवास सोनी,सचिव राजगोपाल मणियार,मार्गदर्शक डॉ. रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, डॉ जगदीश मुंदडा ,राजू इनानी, द्वारकादास भुतडा, आनंद बजाज, सत्यनारायण सोमाणी,विष्णुदास लोया, शिरीष नावंदर सह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या