प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात महाप्रसाद वाटप

उदगीर (एल.पी.उगीले)
एप्रिल महिन्यातील गुढीपाडवा व रामनवमी निम्मित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय, शाहू सोसायटी उदगीर येथे ईश्वरीय संदेश देणे हेतू ब्रह्म भोजनचे कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमास शाहू सोसायटी उदगीर शाखेच्या संचालिका बी.के.अरुणा बहन उपस्थित होत्या. अरुणा दीदी ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, शेंनगाव तसेच उदगीर येथील शाहू सोसायटी च्या मुख्य संचालिका आहेत.
या कार्यक्रमास उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रीतीताई चंद्रशेखर भोसले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या ईश्वरीय संदेश कार्यक्रमाचा तथा ब्रह्म भोजनाचा जवळपास २५० उदगीर वासियांनी लाभ घेतला.