गंगनबीड येथे मोठ्या उत्साहात समुदाय दत्त कार्यक्रम संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले)
सरकारी माध्यमिक विद्यालय चवरदापका शाळेचे सहशिक्षक नवनाथ गायकवाड हे शाळा पाहणी करण्यासाठी आलेले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे पाठ योजना, पाठ टाचन, दैनंदिन पाठ नियोजन, वार्षिक क्रिया योजना, रुपकात्मक मूल्यमापन संकलनात्मक मूल्यमापन दोन्ही सत्र वह्या विद्यार्थी हजेरी पट, शिक्षक हजेरी पट सर्व रेकॉर्ड पाहिले. खूपच चांगल्या प्रकारे नियोजित ठेवले आहेत.असे त्यांनी यावेळी म्हणाले. सराव परीक्षा, घटक परीक्षा सर्व दाखले खूपच व्यवस्थीत ठेवलेली आहेत.मार्क रजिस्टर पूर्ण केलेले आढळले आहे.मध्यान्ह भोजन कार्यक्रम योजना, शाळेतील सर्व दाखले खूपच चांगल्या प्रकारे व्यवस्थित रित्या नोंद करून ठेवले अहेत. यावेळी गगणबीड उच्च प्राथमिक शाळेतर्फे नवनाथ गायकवाड यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि शाळेच्या भविष्यासाठी अंकुश वाडीकर एक झुंजारवृत्तीचे व्यक्तिमत्व आपल्या गावाचे सुपुत्र असून वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन आणि सल्ला सर्वांनी घ्यावा, आणि आपल्या गावची नसून आपली शाळा आहे अशी भावना ठेऊन आपली सेवा देत रहा. असे त्यांनी यावेळी सांगितले.
गंगनबीड या गावातील शाळा नवीन इमारत होऊन तीन वर्षे पूर्ण झालेली नाहीत तरी शाळेची व्यवस्था काटेकोरपणे ठेवण्यात आलेली आहे. शासनाचे शैक्षणिक साहित्य असतील, भौतिक सुविधा असतील, अनेक बाबीवर काळजीपूर्वक शाळेच्या मुख्याध्यापिका व सह शिक्षकांनी नियोजनबद्ध शाळेची आकारणी व्यवस्थित काटेकोरपणे करण्यात आलेली आहे. एफ एल एन आणि बेसिक ज्ञान अत्यावश्यक असल्याने यांची नितांत गरज आहे.आजच्या या आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतकी माहिती आणि ज्ञान जर आपल्या भागातील विद्यार्थ्यांना दिली तर आपले विद्यार्थी शिक्षणात आणि भविष्यात कुठे सुधा कमी पडणार नाहीत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनोरमा पांचाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम वाडीकर, सहशिक्षक रामराव बिरादार, काशिनाथ गायकवाड, रमेश काडोदे, ज्ञानेश्वर म्हैत्रे, अंकुश वाडीकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शाळेची नवीन इमारत होऊन तीन वर्षे पूर्ण झालेली नाहीत .तरीही शाळेची शैक्षणिक, भौतिक सुविधा शासनाच्या योजना चांगल्या प्रकारे राबवून दापका परिसरात आदर्श शाळेचा भौतिक व शैक्षणिक रूप या ठिकाणी तयार झालेला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामराव बिरादार व आभार प्रदर्शन काशिनाथ गायकवाड यांनी केले.