मलकापूरच्या भारती पवार ने पहिल्याच राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले .

मिनी सब जुनियर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा आंध्र प्रदेश गुंटूर येथे स्पर्धा पार पडल्या .
या स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील मलकापूर गावच्या भारती पवार चा सहभाग होता .
या स्पर्धेमध्ये 13 वर्षे योगटातील मलकापूर या गावची कन्या
भारती बाबाराव पवार हिने
इंडिव्हिज्युअल एलिमिनेशन प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले .
भारतीला हे सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी एकूण 5 फेऱ्या मधून प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करावे लागले आहे.तेव्हा ती या सुवर्णपदका पर्यंत पोहोचू शकली आहे.
महाराष्ट्राकडून भारतीची सुवर्ण पदकाची अंतिम स्पर्धा हि हरियाणा राज्याच्या सेजल शेरा हिच्यासोबत झाली .
ही स्पर्धा एकूण पाच राऊंडमध्ये पार पडली, या स्पर्धेमध्ये दोघेही एक से बडकर एक होत्या, असं म्हणल्यास काही हरकत नाही.
भारती पवार ही गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये सुधीर पाटील ,सुषमा पवार ,मारोती बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे .या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल लातूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे, सचिव अशोक जंगमे, सहसचिव राजेश देवकर ,हनुमंत केसरे,नवनाथ गरगटे ,क्रीडा प्रेमी भास्कर पाटील, यमुना जी भुजबळे ,गजानन पवार ,संदीप देशमुख ,खलील खान पठाण ,उमाकांत भेदे,सतीश मुरकुटे , जिलानी शेख यांनी अभिनंदन केले आहे.