निडेबन येथे सम्राट अशोक जयंती निमित्त अन्नदान

उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील निडेबन येथील
कै.चांदोबा सोमवंशी मानवी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था त्यांच्या वतीने सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने पंचशील चौक येथे खीर वाटप करण्यात आली. या प्रसंगी सुनील सोमवंशी (ग्रामपंचायत सदस्य), दशरथ शिंदे (ग्रामपंचायत सदस्य), संदिप अनंतवाळ (ग्रामपंचायत सदस्य),अविनाश सोमवंशी (संस्था सदस्य), धम्मसागर सोमवंशी (संस्था कोषाध्यक्ष), मारोती सोमवांशी शशिकांत, सोमवंशी अजय कचरे, गौतम सोमवंशी, प्रमोद गायकवाड, उमित कांबळे, दिगंबर सोमवंशी, विक्रम सोमवंशी या मान्यवरांसह गावकरी मंडळी उपस्थित होती.