शासकीय कामात अडथळा आणत महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सावित्रा नारायण रायपल्ले या दिनांक 6 एप्रिल रोजी शासकीय कामकाजाच्या निमित्ताने गेलेल्या असताना, आरोपी गणेश पद्माकर काटकर (वय 41 वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी राहणार विकास नगर देगलूर रोड उदगीर) यांनी त्याचे वकील विजय माने पाटील यांनी चितावणी दिल्या वरून पोलीस अधिकारी सावित्रा रायपल्ले यांच्या हाताला धरून वाईट हेतू ठेऊन छातीला हात लावून ढकलून दिले.
पोलीस अधिकाऱ्यांनी शासकीय कामकाज चालू असताना व्हिडिओ का बनवता ? असे विचारले असता आरोपीने तू विचारणारी कोण आहेस? असे म्हणून वाईट उद्देशाने माझ्या हाताला पकडून माझ्या छातीला हात लावून मला जोरात ढकलून देऊन, विनयभंग केला आणि आपण करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. व शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची अप्रतिष्ठा होईल असे कृत्य केले. वगैरे जबाब दिल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या आदेशावरून आरोपीच्या विरुद्ध गु.र.न. 181/ 25, 132, 74, 75, 115 (2), 121 (1), 351 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करत आहेत.