संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि बँक खाते शहानिशा करावी – बोरगावकर

उदगीर (एल.पी.उगीले)
उदगीर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थी यांनी आधार कार्ड किंवा बँक खाते शहानिशा करून घेण्याचे आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसाह्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उदगीर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना इत्यादी योजनेच्या लाभार्थी यांना डीबीटी पोर्टल अनुदान वितरित होणार असल्यामुळे या योजनेच्या लाभार्थी यांनी आपल्या आधार कार्ड व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. आधार कार्ड व्हेरिफिकेशन झाल्या शिवाय सदर योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नाही. त्याकरता संबंधित सज्जा अंतर्गत गावातील लाभार्थी यांनी आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी संलग्न करून घ्यावा. आधार कार्ड व्हेरिफिकेशन करण्यासाठी वाढते तापमान यामुळे लाभार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरता लाभार्थी यांनी तहसील कार्यालयात हजर न राहता, तहसील कार्यालयामार्फत सज्जा निहाय कॅम्पंचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना इत्यादी योजनेच्या लाभार्थ्यांनी नेमून दिलेल्या तारखेस आपल्या तलाठी सज्जा येथे आधार व्हेरिफिकेशन करून घेणे करता सोबत आधारशी लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. व त्यांच्या तारखे संदर्भात संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. असेही आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले आहे.