अनन्या देशपांडे हिचे जवाहर परीक्षेत उज्वल यश

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी कु. अनन्या स्मिता सुनीत देशपांडे हिने जवाहर नवोदय परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.
लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेश पूर्व परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षेत जिल्ह्यातुन जवळपास 12 हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी केवळ 80 विद्यार्थी पात्र झाले आहेत. शिवाय उदगीर तालुक्यातील केवळ 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या पात्र विद्यार्थ्यां मध्ये अनन्या देशपांडे हिचा समावेश आहे.
कु. अनन्या स्मिता सुनीत देशपांडे हिने शिक्षणासोबतच पोहणे, कथक, गायन, पेटी वाजवीने अशा अनेक आवडी जोपसल्या आहेत. अवघ्या 5 वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीने अशा अनेक आवडी जोपसल्याबद्दल तिचे कौतुकहि होत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जवाहर नवोदय प्रवेशपूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनन्या देशपांडे हिने परीक्षेसाठी कसलीही शिकवणी न करता 12000 विद्यार्थ्यांमधून हे यश संपादन केले आहे. कु. अनन्या हिने आलम्पियाड सह विविध स्पर्धापरीक्षेत विशेष प्रविण्यासह यश मिळविले आहे.
कु. अनन्या हिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.