भव्य मिरवणूकीने भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याण महोत्सव उदगीर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन मंदिरापासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सकाळपासून भक्तांनी जैन मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. तदनंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत महिला मंडळातर्फे विशेष लेझीम खेळाचे प्रदर्शन करण्यात आले. जैन मंदिरातून निघालेली शोभयात्रा चौबारा, कॉर्नर चौक, पत्तेवार चौक, मुक्कावार चौक, आर्यसमाज, सराफ लाईन मार्गे परत जैन मंदिरात हि शोभयात्रा स्थिरावली.
शोभायात्रेच्या सांगता झाल्यानंतर मंदिरात भगवंतांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला व त्यानंतर सर्व उपस्थित समुदायासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या शोभायात्रेत राजकुमार मानवतकर, विशाल जैन, हिरालाल जैन, पद्मकुमार जैन, कुलभूषण चौधरी, पारस जैन, सागर मानवतकर, विजय फुलाडे, सुनील जैन, राजू डोलचीपुरे, नितेश जैन, जवाहरलाल जैन, वर्धमान डोलचीपुरे, रमेश डांगूर अतिवीर डांगूर, कोमल जैन,दिपा मानवतकर, संध्या जैन, शीला जैन, प्रगती जैन, सोनाली जैन, अश्विनी जैन, पिंकी मानवतकर, स्नेहा मानवतकर, सेजल जैन, प्रीती कोंडेकर, श्रद्धा म्हेत्रे, विद्या जबडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.