चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी

0
चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले)
महान सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त भव्य रँली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व गटविकास अधिकारी प्रविण सुरोडकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. भंते नागसेने बोधी, बोधाचार्य विद्यासागर डोरनाळीकर यांनी जयंती रॅली मार्गदर्शन व मार्गक्रमण केले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सिध्देश्वर पाटील, खरेदी- विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, बाबासाहेब सुर्यवंशी, जितेंद्र शिंदे, एम.एम. बलांडे, एन. सी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महान धम्म प्रचारक सम्राट अशोक यांची जयंती मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून शहरातील विश्वशांती बुध्द विहार येथे सांगता करण्यात आली. मोठ्या उत्साहात समाजातील उपस्थित जनसमुदाय जयघोष करीत होते. या जयंती रॅलीत प्रमुख्याने भारतीय बोध्द महासभा, समता सैनिक दल सहभागी होते. शिवाय विविध सामाजिक संघटना तसेच पप्पू गायकवाड, अविनाश गायकवाड, रामजी पिंपरे, सुनील पकोळे, अमोल सुर्यवंशी, सुनील गोडबोले, सचिन गायकवाड, सग्राम गायकवाड, जनार्दन सुर्यवंशी आदींसह शहर व ग्रामीण भागातील बोध्द अनुयायी उपस्थित सहभागी होते.

चौकट……..
भव्य दिव्य रथातून मिरवणूक……

उदगीर शहरात चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती निमित्त भव्य दिव्य अशा पद्धतीची रॅली एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच निघाली. विशेष म्हणजे संयोजन समितीतील कार्यकर्त्यांनी कोणाकडेही चार पैशाचा निधी किंवा जबरदस्तीने खंडणी पद्धतीने देणगी मागितली नाही. स्वयंस्फूर्त पणे या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने भव्य अशी रॅली रथातून काढली. रॅली पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक थांबली होती.

चौकट…….
सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने आदर्श घ्यावा….

विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राजकारणासाठी साजरी न करता, समाजकारणासाठी आणि समाजाला प्रेरणा देण्यासाठी, बाबासाहेबांचा संदेश समाजातील तळागाळातील लोकांना मिळाला पाहिजे. बाबासाहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. या तळमळीने साजरी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने प्रयत्न करावा. अशा पद्धतीची चर्चा आता रंगू लागली आहे. दुर्दैव म्हणजे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने मिरवणुकीसाठी नगरपालिकेकडे कचरा टाकणाऱ्या ट्रॅक्टरची मागणी केल्याची मजेशीर चर्चा रंगू लागल्याने सार्वजनिक जयंती समिती केवळ जयंती साजरी करायची म्हणून करणार आहेत की काय? सामाजिक बांधिलकी, आवड म्हणून जयंती साजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना केवळ राजकारणी लोकांनी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीवर वर्चस्व निर्माण केल्याची टीका काही धम्मबांधव करत आहेत. राजकारणी लोकांनी किमान बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळी तरी राजकारण सोडून धम्मकारण करण्याचा प्रयत्न करावा. अशी जाणकार लोकांची प्रतिक्रिया येऊ लागली आहे.

चौकट……..

कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढल्यास आंदोलन…..

विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती उत्साहाने साजरी व्हावी, म्हणून प्रत्येक अनुयायी तन मन धनाने प्रयत्न करत असतो. मात्र दुर्दैवाने पुढे होणारे मोहरके जर गुत्ते सारण्यासारखी पद्धत करत असतील तर ते लाजिरवाणी आहे. नगरपालिकेकडे कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची मागणी करणे ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे. सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने भव्य दिव्य अशा पद्धतीची मिरवणूक काढावी. असा संदेशच जणू चक्रवर्ती सम्राट अशोका जयंती महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिला आहे. अशी ही चर्चा आता शहरात चालू झाली आहे. तो आदर्श ठेवून मिरवणूक काढावी अन्यथा कचरा वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर मधून जर मिरवणूक काढली तर आंदोलन करू असा इशाराही युवा पॅंथर च्या वतीने देण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!