सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्तविलास युनिट-2 कारखाना स्थळी वृक्षारोपन व रक्तदान शिबीर

उदगीर (एल.पी.उगीले)
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमीत्त विलास सहकारी साखर कारखाना लि.,युनिट-2,तोंडार येथे रक्तदान शिबीर’ व वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला.
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांचे लातूर जिल्ह्याच्या वैभवातील योगदान व त्यांचे सहकार क्षेत्रातील पुढाकार यामुळेच आज लातूर जिल्ह्यामध्ये आगदी ग्रामीण भागासह आर्थिक क्रांती झाल्याचे दिसून येते. अशा या युगपुरूषाचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे.
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी साखर कारखान्यांनी फक्त साखर उत्पादनापर्यंतच मर्यादीत न राहता एक सामाजीक बांधीलकी म्हणुन मांजरा परीवारातील सर्व साखर कारखान्यांनी नेहमी सामाजीक व राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, अशा अनेक वेळा सुचना दिलेल्या आहेत तोच धागा पकडून कारखान्याचे संस्थापक चेअरमन अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार विलास सहकारी साखर कारखाना लि,युनीट-2, तोंडार येथे अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमीत्त नागप्पा आंबरखाने ब्लड बँक,उदगीर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाच्या या राष्ट्रीय कार्यात विलास युनिट-2 कडील 75 अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी सहभाग घेवून रक्तदान केले. यासाठी नागप्पा आंबरखाने ब्लड बॅकेचे डॉ.बस्वराज शेटकार व त्यांचे संपुर्ण टीमने सहकार्य केले.
त्याचबरोबर कारखाना परिसर सुशोभीत करण्यासाठी व पर्यावरण संतुलन राखण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने वृक्ष लागवडी संदर्भात हाती घेतलेल्या राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभाग घेता यावा, या दृष्टिकोणातून आमृतमोहत्सवी वाढदिवसाचे औचीत्य साधून कारखाना साईटवर ‘वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कारखाना साईटवर 75 शेाभीवंत झाडाची लागवड करण्यात आली.आमृतमहोत्सवी वाढदिवसा निमीत्त कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख, कारखान्याचे नूतन व्हा.चेअरमन वैजनाथदादा शिंदे व सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक ए.आर. पवार यांनी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास विलास युनिट-2 चे निमंत्रीत संचालक कल्याण पाटील,राजेंद्र पाटील, पंडित ढगे, ज्ञानोबा गोडभरले,विनोबा पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक आत्माराम रामचंद्र पवार, सर्व विभागाचे खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी व परीसरातील साहेब प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.