दिलीपरावजी देशमुख यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उदगीर येथे साजरा

उदगीर (एल.पी.उगीले)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उदगीर काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करुन साजरा करण्यात आला. सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांना दीर्घायुष्य आयुष्य मिळावे म्हणून उदगीर येथील श्री उदागीरबाबा महाराजांच्या पावन स्मर्तीस दुग्धअभिषेक व हजरत खाजा सयोदिन बाबा यांच्या दरग्यात फुलांची चादर चढवून दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना व दुवा करण्यात आली. तसेच लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येऊन, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोयाबीन बनिम जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्याना प्रत्येकी पंचेवीस हजाराचा धनादेश वाटप करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, कृ.ऊ.बाजार समिती सभापती प्रितीताई भोसले, शिवाजीराव हुडे, शहराध्यक्ष मंजूरभाई पठाण, संचालक मधुकरराव एकुर्केकर,संतोष बिरादार, रविद्र कोरे, मेहबुबभाई शेख, श्रीकांत पाटील, प्रमोद पाटील, शिवाजी पाटील, मोहन पाटील, विनोबा पाटील, ज्ञानोबा गोडभरले, प्रा. गोविंद भालेराव, बबन धनबा, नाना ढगे, विनोद सुडे,माधव कांबळे, शिवाजी लखवाले, नीलकंठ बिरादार, नामदेव बिरादार प्रेम तोगरगे ,संतोष वळसने, बालाजी पाटील, रामेश्वर बिरादार जकनाळकर , समशोद्दीन जरगर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विवेक जाधव, युवक शहराध्यक्ष आदर्श पिंपरे, अतुल बिरादार, दत्ता बिरादर, श्रीनिवास एकुर्केकर,परमेश्वर अडगुलवार,फय्याज डांगे,सदाम बागवान, सतीश पाटील माकणीकर,विपिन जाधव,कनिष्क शिंदे,सचिन वाघमारे,प्रविन पटवारी,प्रशांत हुडगे, पद्मशिंह करकेलिकर यांच्यासह कृ. बा समितीचे संचालक मंडळ, तालुका, शहर व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.