शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, लाडक्या बहिणींना २१०० द्या – शिवसेनेचे निवेदन

0
शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, लाडक्या बहिणींना २१०० द्या - शिवसेनेचे निवेदन

उदगीर (एल.पी.उगीले) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत
भाजप प्रणित सरकारने सत्तेत बसण्यासाठी वचनामा जाहीर केला होता. त्या जाहीरनाम्याची सरसकट अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सरकारने स्वतःच भले करण्याच्या नादात पाप झाकू नये, जनतेचे भले करण्यासाठी काम करावे. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. व लाडक्या बहिणींना २१०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. शेतातील व घरगुती वीज बिल माफ करणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी बँकेचे घेतलेले कर्ज माफ करण्याऐवजी बँकेने कर्जधारक शेतकऱ्यांना त्रास देण्याच काम सुरू केले आहे. आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला कुठल्याही प्रकारचा हमीभाव दिला जात नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, त्याबद्दल कर्ज वसुली सक्तीची करण्यात येत असून ती कर्ज वसुली तात्काळ थांबविण्यात यावी.सततच्या नापिकीमुळे व सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकऱ्यांना मागे आड, पुढे विहीर अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जापोटी आत्महत्येचा मार्ग अवलंबित असून शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, म्हणून तात्काळ कर्ज वसुली थांबण्यात यावी, व कर्जमाफी देण्यात यावी. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यात यावे. शेतीतील व घरगुती वीज बिल माफ करण्यात यावे. घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्यात यावी. घरकुलाचे अनुदान त्वरित देण्यात यावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, जिल्हा समन्वयक प्रकाश हैबतपुरे, जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर औरादे, तालुकाप्रमुख प्रशांत मोरे , शहर प्रमुख बालाजी सोनाळे, शिवसेनेचे मार्गदर्शक श्रीमंत सोनाळे, अंकुश कोणाळे, तालुका संघटक बालाजी पुरी, युवा सेना शहर प्रमुख रोहित पाटील,व्यंकट साबणे, वाहतूक सेना तालुका प्रमुख शरद सावरे, उपतालुका प्रमुख महेश फुले, युवा सेना जिल्हा समन्वयक रमण माने, उपजिल्हा प्रमुख उपेंद्र काळेगोरे, युवा सेना तालुका प्रमुख चंद्रकांत सांगळे, एस टी कामगार सेनेचे सचिन पटवारी, विभागीय कोषाध्यक्ष धनराज स्वामी, आगार सचिव विनायक श्रीडोळे, संघटक सचिव संतोष माळी,मनोज फुले,भरत भंडे, नारायण पाटील,शहर संघटक संजय मठपती, विधानसभा संघटक व्यंकट साबणे, शिक्षक सेना तालुका प्रमुख तात्याराव मुंडे, अरुण बिराजदार, मिथुन वाडीकर, अरुण बिरादार, बन्सीलाल कांबळे, अशोक भुरे, महेश पोलकर,शिवकांत चटनाळे, विठ्ठल इंद्राळे, शशीकांत बिचकुंदे,राम कांबळे,गंगाधर बाजगिरे,ईश्वर पांचाळ, अमर मोरे,जिल्हाकार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले, मुन्ना पांचाळ इत्यादींच्या सह्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!