“जागतिक वसुंधरा दिनानिमित्त नगरपरिषद द्वारे शिवनगर उद्यानाची श्रमदानातून स्वच्छता मोहीम

उदगीर (एल.पी.उगीले)
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार जागतिक वसुंधरा दिन निमित्य “पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा” या अनुषंगाने विविध उपक्रमाने साजरा करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे निर्देशित केले आहे. त्यानुसार उदगीर नगरपरिषदेच्या वतीने दि.२२ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान विविध उपक्रमांची आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात मुख्याधिकारी तथा प्रशासक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर नगरपरिषदेचे विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांच्या द्वारे श्रमदानातून शिवनगर उद्यानाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. सदर स्वच्छता मोहीम संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्वांना शुभम मटके यांनी हरित उदगीरची शपथ दिली. या स्वच्छता मोहिमेचे नियोजन यशस्वी होण्यासाठी स्वच्छता विभाग प्रमुख विशाल आल्टे, स्वच्छता निरीक्षक उमाकांत गंडारे,अमित सुतार, सिकंदर शेख,विनोद रंगवाळ यांच्या सह शहर समन्वयक प्रफुल्ल आदावळे यांनी मेहनत घेतली.
दिनांक २२ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत निसर्गाच्या “पंचमहा भूतांच्या भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) या घटकांपैकी किमान एका घटकावर दररोज काम करण्यात येणार आहे . यामध्ये प्रामुख्याने सध्या घडत असलेले वातावरणातील बदलांमागची कारणे, नागरीकांना समजावून सांगून एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी वैयक्तीकरित्या अथवा सामुहिकरित्या पर्यावारणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी एक छोटेसे पाऊल उचलल्यास वातावरणातील हे बदल काही अंशी कमी होण्यास मदत होवू शकेल, तसेच, शाळा व कॉलेज यामध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहेत,सदर स्पर्धेचे उद्दिष्ट आपल्या वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन हे असेल.
दिनांक २२ एप्रिल, ते २४ एप्रिल, २०२५: या तीन दिवशी नगरपरिषदे द्वारे नाले, तलाव, शहरातील विविध ठिकाणाची स्वच्छता मोहीम आयोजित करून सदर कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि विविध सामाजिक संस्था यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. दिनांक २५ ते २७ एप्रिल, २०२५ या तीन दिवशी Reduce-Reuse-Recycle वावर आधारित विविध प्रयोगांचे आयोजन शाळा, महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्थामध्ये व इतर ठिकाणी करण्यात यावे, या प्रयोगांमधून सर्वोत्तम तीन प्रयोगांची (उमेदवारांची) निवड करून त्यांच्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात येणार.
दिनांक २८ ते ३० एप्रिल, २०२५ या कालावधीत “पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ” या ब्रीद वाक्यानुसार पर्यावरणाशी अनुषंगीक एक ब्रीद वाक्याबाबतचे अभियान,स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्राप्त होणाऱ्या ब्रीद वाक्यांमधून तीन उत्कृष्ट ब्रीदवाक्ये निवडण्यात येतील. निवड केलेल्यांना प्रामणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल . सदर ब्रीदवाक्य येत्या वर्षात पर्यावरण विषयक विविध कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येतील,तरी उदगीर शहरातील सर्व नागरिकांनी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी या सर्वांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित केलेल्या दि.२२ ते ३० एप्रिल २०२५ या विविध कार्यक्रमां मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून वसुंधराच्या संवर्धन व संरक्षणासाठी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक सोमनाथ जाधव यांनी केले आहे.