श्री पांडुरंग विद्यालयात कागदी छत्र्यांची निर्मिती

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर येथे उन्हाची तीव्रता ओळखून कला शिक्षक नादरगे चंद्रदीप यांच्या मार्गदर्शना खाली आनंददायी शनिवार या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कागदी छत्र्याची निर्मिती करून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी एक अनोखी आणि शाश्वत विचारांची कल्पना साकारली. त्यांनी कागदा पासून सुबक छत्र्या तयार करून ‘उन्हापासून संरक्षणासाठी छत्रीची खूप गरज आहे परंतु, जनता ही फक्त पावसाळ्यातच कापडी छत्रीचा वापर करते, उन्हाळ्यातही कापडी छत्रीचा जनतेने वापर करावा, ही काळाची गरज’ या संकल्पनेला मूर्त रूप दिले.
वाढते तापमान, त्वचेच्या आजारांचा धोका आणि उष्माघात यामुळे उन्हापासून बचावासाठी छत्रीचा वापर अत्यावश्यक आहे, हे विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वीच ओळखले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पर्यावरणपूरक साहित्य वापरत हाताने छत्र्या तयार केल्या. या छत्र्यांचे प्रदर्शन विद्यालयात लावून विद्यार्थ्यांनी उन्हापासून संरक्षणाबाबत जनजागृतीही केली.
या उपक्रमात ८वी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. छत्री ही केवळ एक वस्तू नसून ती आरोग्याचे रक्षण करणारे प्रभावी साधन ठरू शकते, हे विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेतून दाखवून दिले. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. गोविंदरावजी केंद्रे , संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. व शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले.