वर्षाराणी मुस्कावाड यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

उदगीर (एल.पी.उगीले)
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूरच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुरुगौरव पुरस्कारसाठी प्रसिद्ध साहित्यिका तथा शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांची निवड केली आहे.
वर्षाराणी मुस्कावाड यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक गुरुगौरव पुरस्काराने दि. 26 एप्रिल 2025 रोजी लातूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
वर्षाराणी मुस्कावाड यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.
आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी वर्षाराणी मुस्कावाड यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्या उत्कृष्ट सहशिक्षिका, सूत्रसंचालिका, गायिका, वक्त्या व लेखिका आहेत.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वर्षाराणी मुस्कावाड यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, धनंजय गुडसूरकर, बालाजी मुस्कावाड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीरचे कार्यवाह प्रा. गौरव जेवळीकर,प्रा आशितोष गोजेगावकर,मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, मुखाध्यापक मोरे, प्रा. धनराज बंडे, प्रा. कुमार बंडे, विवेक होळसंबरे, अंबिका पारसेवार व इतर मान्यवर आणि शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील सहशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.