सैनिकी विद्यालयाचे तीन विद्यार्थी जेईई अडव्हान्ससाठी पात्र

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे तीन विद्यार्थी जेईई अडव्हान्ससाठी पात्र झाले आहेत.
जेईई परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात संकेत केशोड ऑल इंडिया रॅंक 7585, अनिकेत चाळणेवाड, साईनाथ येलाले या तीन विद्यार्थ्यांची निवड जेईई अडव्हान्स परीक्षेसाठी झाली आहे.एनटीए – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स 2025 परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. या परीक्षेसाठी देशभरातून 10.61 लाख विद्यार्थी बसले होते. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्या साठी ही परीक्षा घेतली जाते. सैनिकी विद्यालयात जेईई, निट, एनडीए, स्पर्धा परीक्षा याची तयारी करुन घेतली जाते.जेईई अडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झालेले तीन विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. शिवाण्णा गंदगे, प्रा. प्रदीप कोठारे, प्रा. सीमा मेहत्रे, प्रा. नितीन पाटील व प्रा. युवराज दहिफळे यांचे अभिनंदन प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख संतोष चामले, विलास शिंदे, सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.