उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जेईई मेन्समध्ये उज्वल कामगिरी

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रीय परीक्षा एजन्सी द्वारे घेतलेल्या जेईई मेन्स सेशन-2 परीक्षेत उज्वल कामगिरी करत महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे. ध्रुव पारसेवाऱ याने 99.95 पर्सेंटाइल मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर मारमवार वेदिका (92.24), सायली सोनकांबळे (86), विश्वजीत पाटील (85.29), वैष्णवी मोरे (85), ओम सुगंधी (80), शुभम उगीले (79.43), संस्कार रेड्डी (79), अभिषेक अणकल्ले (76.78) आणि हर्षल कांबळे (75) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड. एस. टी. पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मुडपे, प्रा. टी. एन. सगर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.