गुरुराज माऊलीच्या नाम संकीर्तनाने भक्ती स्थळ येथे गुरु पौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा

गुरुराज माऊलीच्या नाम संकीर्तनाने भक्ती स्थळ येथे गुरु पौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्ती स्थळ येथे गुरुपौर्णिमेनिमित्त संजीवन समाधी अभिषेक तीर्थ प्रसाद व गुरुराज माऊली त्यांच्या भजनाने भक्तिमय वातावरणात गुरू पोर्णिमा उत्साहात संपन्न झाली.
राष्ट्रसंत सदगुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीचा पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर गुरवर्य यांच्या पादुकांचे तीर्थ घेऊन भक्ताने गुरुराज माऊली व शंकरा हरा या भजनामध्ये माऊलीच्या पादुकाची मिरवणूक काढली यावेळी मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी यांची उपस्थिती होती कीर्तन सेवा मोहन कावडे गुरुजी यांची संपन्न झाली यावेळी आचार्य स्वामी व उत्तराधिकारी राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वाचन झाले.

गुरु सर्व तीर्थांचे सार

आचार्य स्वामी यांनी आपल्या प्रवचनात गुरु हा सर्व तीर्थाचे सार असुन मग तो कोणत्याही क्षेत्रातला असेल तर आपण त्याला गुरू मानतो जन्मता आई वडील आपले गुरू असतो शिकवणारे शिक्षक आपले गुरु आहेत तर भव सागरातून पार करणारे राष्ट्रसंत सद्गुगुरूचे आपण सर्व भक्त आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे आणि कायमस्वरूपी आपण त्यांनी दिलेल्या आचार विचार व आचरण वर चालले पाहिजे अस शेवटी सांगितले.

भक्तांना अन्नसेवन

गुरुपौर्णिमा निमित्त आलेल्या भक्तांना मागील 60 वर्षापासून कै गुरुनाथ मेनकुदळे यांच्या स्मरण शिवकुमार घंटी, भगवान डोंगरे, काशिनाथ दांडगे यांनी अन्नदान केलं तर तोंडारे व नांदेड भजनी मंडळ यांनी अन्न सेवेत सहभाग नोंदवला.

दिंड्यांचे आगमन
कालपासूनच भक्ती स्थळ येथे गावो गावच्या दिंड्या येत होत्या तर तोंडार चवळेवाडी ,उदगीर, वाढवणा दिंड्या व मोटार सायकल रॅली सह भजन व नामसंकीर्तनाने दाखल होत होत्या यावेळी शि. भ. प. भगवंतराव चाभंरगेकर पाटील, शिवराज आप्पा नांवदे, शि.भ.प.मोहन कावडे हासनाळकर, शिवलिंग पाटील किनीकर, दिंडी प्रमुख मन्मथ पालापुरे, विश्वनाथ स्वामी, बालाजी पाटील येरोळकर, रतीकांत स्वामी तोंडार चंद्रकांत हैबतपुरे गायक, वादक वैजनाथ मुरूडे, किनीकर, विठ्ठलराव जाकापुरे, रमेश वांजर खेडकर,लक्ष्मण चवळे शेलदरकर तसेच माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी आमदार विनायकराव पाटील उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर( मुन्ना )पाटील राजकुमार मजगे, होनराव कमलाकर पाटील यांच्यासह विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी कीर्तनकार गायक वादक भक्तमंडळी उपस्थित होते.

एसटी बस सेवा
अहमदपूर आगारातून विशेष बस सेवा तसेच एक कंट्रोल पॉईंट ठेवला महामार्गावरील बसेस मध्ये भक्तांना व्यवस्था करण्यात आली यावेळी आगार व्यवस्थापक शंकर सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले

About The Author

error: Content is protected !!