ग्रामीण भागात मटका चालू असल्याची माहिती मिळताच ,गुन्हे शाखा पोलिसांची धाड, गुन्हा दाखल

उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मटका चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी या परिसरात सतत धाडी टाकायला सुरुवात केली आहे.
उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील अंगणवाडी जवळ मटका खेळताना व खेळविताना समद जहागीरदार यास रंगेहात पकडले. वाढवणा बु. येथील दोस्ताना हॉटेल मध्ये मिलन डे नावाचा मटका खेळताना व खेळवताना रंगेहात मुद्दे मालासह कलीम शादूल आवाळे,यास दोस्ताना हॉटेल मध्ये पकडले. वाढवणा (बु.)येथील दोन मटका किंग तर एक हंडरगुळी येथील युनूस मुजमील शेख यास हाळी येथील महाराष्ट्र ज्युस च्या पाठीमागील बोळात मुद्दे मालासह पकडण्यात आले. या तीन मटका किंगवर स्थानिक गुन्हे शाखा लातूर पोलिसांनी श्रीदेवी, मिलन डे नावाचा मटका खेळताना व खेळवताना रंगेहात पकडून 36130 रुपये मुद्दे मालासह वाढवणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांकडून हत्या आलेली माहिती अशी की, फिर्यादी गोरखनाथ कसबे, फिर्यादी साहेबराव हाके आणि फिर्यादी अर्जुसिहं राजपूत या तिघांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु. र. नं 122/2025, 123/25/, 124/25 आरोपी युनूस मुजमिल शेख (रा. हंडरगुळी),समद जहागीरदार (रा. वाढवणा बु,),कलीम शादूल आवाळे ,या तीन मटका चालवणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हळी येथील महाराष्ट्र ज्युस सेंटरच्या पाठी मागील बोळातील रोडवर आपल्या फायद्यासाठी श्रीदेवी नावाचा मटका जुगार खेळताना व खेळविताना जुगाराचे साहित्य रोख नगदी 1110 रुपये मुद्दे मालासह युनूस मुजमिल शेख यास पकडून वाढवणा ठाण्यात कलम 12 (अ )प्रमाणे महाराष्ट्र जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी साहेबराव हाके लातूर पोलीस यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गु. र. नं 123/25 आरोपी समद जहागीरदार (रा. वाढवणा (बु.)वय 40) हा मिलन डे नावाचा मटका खेळताना व खेळवताना अजून आला. त्याच्याकडे मुद्दे माल 15000 रुपये मोबाईल व नगदी रोख 3290 रुपये असा 18290 रुपये ऐवज आढळून आला. त्यास अटक करून कलम 12(अ )महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी अर्जुनसिहं राजपूत लातूर गुन्हे शाखा पोलीस, आरोपी कलीम शादुलआवाळे (रा. वाढवणा बु. वय 36) वाढवणा बुद्रुक येथील दोस्ताना हॉटेल मध्ये मिलन डे नावाचा मटका जुगार स्वतःच्या फायद्यासाठी खेळताना व खेळविताना अजून आला. त्याच्या जवळील मटका जुगाराचे साहित्य, ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत 15000 रुपये, रोख 1720 रुपये असा एकूण 16720 रुपये मुद्दे मालासह पकडून गु. र. नं. 124/25 कलम 12(अ ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे आरोपी कलीमशादुल आवाळे यांच्या विरुद्ध वाढवणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गावात पोलीस स्टेशनच्या हाकेवरच हॉटेल, दुकानात मटक्याची खुलेआम दुकाने चालू असुन देखील स्थानिक या अवैध धंद्याकडे डोळेझाक करत असल्याची ओरड गावकरी करत आहेत. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व मटका, जुगार,अवैध दारू वर कार्यवाही, गुन्हेदाखल करिता ठेवलेल्या स्थानिक बिट जमादारांना दुकाने दिसत नसतील का ? जिल्ह्यातील पोलिसांना येऊन कार्यवाही करावी लागते, तर स्थानिक जमादार कशा साठी?असा प्रश्न सामान्य ग्रामस्थांना भेडसावत आहे. वाढवणा व हाळी हंडरगुळी येथे खुले आम मटका चालू असल्याची गुप्त माहिती मिळताच लातूर गुन्हे अनवेशन शाखा लातूर पोलिसांनी रंगेहात वाढवणा बु येथील दोस्ताना हॉटेल मध्ये धाड घालुन तसेच अंगणवाडी च्या जवळील मटका व हाळी येथील महाराष्ट्र ज्युस च्या पाठीमागील बोळातील रस्त्यावरील तिन्ही मटका किंगना मुद्देमालासह रंगे हात पकडून वरील तिन्ही आरोपीतावर वाढवणा बु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.