डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते गांधी चौक पोलीस ठाणे परिसरात आर ओ वॉटर पुरिफायर व वॉटर कुलरचे लोकार्पण

लातूर (एल पी उगिले)
साई फाउंडेशन च्या वतीने बसविण्यात आलेल्या लातूर येथील गांधी चौक पोलीस ठाणे परिसरात आर ओ वॉटर पुरिफायर व वॉटर कुलरचे डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाणे परिसरात पोलीस बांधवांची शुद्ध पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, म्हणून साई फाउंडेशन या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने 50 लिटर क्षमतेचे आर ओ वॉटर प्युरिफायर व 100 लिटर साठवण क्षमतेचे वॉटर कुलर बसविण्यात आले असून त्याचे लोकार्पण भाजपा नेत्या डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ,रवींद्र करे,पोलीस उपनिरीक्षक पंडित भंडारे, दयानंद आरदवाड, मुरलीधर सूर्यवंशी, राखीताई गायकवाड ,गुंडाप्पा अष्टांगे, शितलताई आचार्य यांच्यासह पोलीस बांधव, कर्मचारी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.