लातूर पोलीसांची प्रतिबंधीत गुटख्यावर मोठी कारवाई.

0
लातूर पोलीसांची प्रतिबंधीत गुटख्यावर मोठी कारवाई.

लातूर (एल पी उगिले) लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि मटक्याने धुमाकूळ घातला आहे. वाढत चाललेल्या चोरट्या वाहतुकीच्या संदर्भात लक्ष ठेवून एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पो.स्टे. एमआयडीसी, लातुर हद्यीमध्ये गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीवरुन सागर किराणा दुकान, बार्शी रोड पाण्याचे टाकीजवळ लातुर येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अंमलदार यांचेकडुन सदर ठिकाणी छापा मारला असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला किंमंत १,९७,१९०/-रुपयाचा गुटखा मिळुन आल्याने इसम नामे इरफान हबीब शेख, (वय ४१ वर्षे रा. काझी मोहल्ला,आनंद नगर लातुर)यांचेवर पोलिस ठाणे एमआयडीसी, लातुर येथे गुरनं. ३६४/२०२५ कलम १२३,२७४,२७५,२२३ बिएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करत आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातुर शहर रणजित सावंत यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक श्रीकांत मोरे, सफौ भिमराव बेल्लाळे, शिंगाडे, पोलिस अमलदार भगवत मुळे,बळवंत भोसले, राजाभाऊ मस्के, प्रशांत ओगले, इश्वर तुरे, महीला पोलीस अंमलदार पल्लवी शिवणकर यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!