गोवंशाची क्रूरपणे चोरटी वाहतूक, गुन्हा दाखल

0
गोवंशाची क्रूरपणे चोरटी वाहतूक, गुन्हा दाखल

उदगीर (एल पी उगीले) एका आयशर टेम्पो गाडीमध्ये तांबड्या, पांढऱ्या व गवळी रंगाच्या आठ बैलाला अत्यंत क्रूरपणे डांबून कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे समजताच, उदगीर शहराच्या जवळ नळेगाव रोड येथे पोलिसांना माहिती समजताच त्या ठिकाणी पोहोचून पोलिसांनी पाहणी केली असता, आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 43 एडी 43 26) या वाहनांमध्ये आठ बैल ज्यांची अंदाजे किंमत चार लाख रुपये होते. ते आपल्या आर्थिक फायद्यासाठी कत्तलखान्याला विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे आढळून आले. या गोवंश जातीचे बैल जनावरे डांबून त्यांना इजा व यातना होईल, अशा पद्धतीने अत्यंत क्रूरतेने वागणूक देऊन बेकायदेशीर पद्धतीने कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आले आहेत. अशा आशयाची फिर्याद पोलीस कर्मचारी देविदास ज्ञानोबा किवंडे यांनी दिल्यावरून आरोपी सुनील बाबुराव राठोड (रा.रेनापुर तालुका रेनापुर) आणि सोहेल मोहसीन अली सय्यद (व्यापारी रा.रेणापुर) यांच्याविरुद्ध गोवंशाला क्रूरपणे वागणूक देणे तसेच गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना बेकायदेशीरपणे त्यांची कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्यावर दोन्ही आरोपीच्या विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरंन 252 /25 कलम 5(A)(1),5(A)(2), सह कलम 11 (ड) (ई) प्राण्यास निर्दयीपणे वागवणे प्रतिबंधक अधिनियम 1960 व मोटार वाहन कायदा कलम 66 (1) 192 अन्वये उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी चार लाखाचे बैल आणि पाच लाखाचा आयशर टेम्पो अशा पद्धतीने नऊ लाखाचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसे हे अधिक तपास करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!