डॉ. पूनम नाथानी दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रुजू

लातूर (एल.पी.उगिले) येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा पदभार डॉ. पूनम नाथानी यांनी स्वीकारला. याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, संयुक्त सचिव विशाल लाहोटी, सहसचिव ऍड. श्रीकांत उटगे, अजिंक्य सोनवणे, महाविद्यालय विकास समिती सदस्य ऍड. श्री आशिष बाजपाई, सीए सुदर्शन भांगडिया यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नियुक्ती मुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कारभारात अधिक गतिमानता येईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
डॉ. पूनम नाथानी या विधि शाखेतील एक अनुभवी आणि प्रतिष्ठित प्राध्यापिका आहेत. त्या विविध शैक्षणिक पदांवर यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विधि क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केले आहे. त्यांच्याकडे शिक्षण आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.त्यांच्याकडे असणारे प्रशासकीय कौशल्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव महाविद्यालया साठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
डॉ. नाथानी यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. पूनम नाथानी यांच्या नियुक्तीमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवनवीन मापदंड स्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.