केंद्रप्रमुख शेषेराव राठोड व मुख्याध्यापक जाकीर तांबोळी यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न

उदगीर (एल पी उगिले) तालुक्यातील तोंडार केंद्राचे केंद्र प्रमुख शेषराव राठोड व लोणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जाकीर तांबोळी यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती समारंभ सोहळा लोणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला. नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त होणारे केंद्रप्रमुख शेषराव राठोड व मुख्याध्यापक जाकीर तांबोळी हे दिनांक 30/4/2025 रोजी सेवा निवृत्त झाल्याने दोघांचा एकुण 37 वर्ष 4 महिना कार्यकाल नक्कीच आदर्शवत होता. सकारात्मक वृत्ती असलेला त्यांचा दृष्टिकोन,त्यांच्या अंगी असलेला एक उपक्रमशील शिक्षक, पदवीधर, केंद्रप्रमुख अशा विविध पदावरील सेवा काल सर्वांनाच आठवणीत राहील. अशा गुणी व प्रामाणिक माणूस म्हणजे केंद्रप्रमुख शेषेराव राठोड सर्वांच्याच हृदयात स्थान मिळवले होते.अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार तोंडार केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविकातून उपक्रमशील शिक्षीका रेश्मा शेख, किरण पाटील व इंगळे मॅडम यांनी केंद्र प्रमुख शेषेराव राठोड व मुख्याध्यापक जाकीर तांबोळी यांच्या एकूणच सेवा काळातील जीवनावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संगीता गुलफूले व प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी शफी शेख, शिक्षण विस्तार अधिकारी शिवराज थोटे, नितीन लोहकरे, गोविंदराव बारसंगे, केंद्रप्रमुख, केंद्रप्रमुख बालाजी धमनसूरे, अविनाश भोसले, माजी सभापती मन्मथप्पा किडे, रामराव राठोड,शिवाजीराव साखरे वाघ, लायक पटेल, दामाजी बालूरे, समीर शेख, समदभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या सेवापुर्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षीका रेश्मा शेख, किरण पाटील, संध्या भंडारे व इंगळे मॅडम यांनी व आभार प्रभारी मूख्याध्यापक भास्कर चव्हाण यांनी मानले.