महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे बारावी निकालात घवघवीत यश

उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या बारावी (H.S.C.) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. विज्ञान शाखेचा निकाल 96.00%, वाणिज्य शाखेचा 80.60% आणि कला शाखेचा 57.00% इतका लागला. विज्ञान शाखेत ध्रुव पारसेवार (82.67%), तृप्ती माने (80.67%) तर वाणिज्य शाखेत समृद्धी मठपती (89.67%), निधी खत्री (87.83%) आणि कला शाखेत अस्मिता कुंजतवाड (91.33%), काजल फड (87.00%) हे विद्यार्थी गुणवत्तेत आघाडीवर राहिले. एम.सी.व्ही.सी. विभागात रेखा केदासे (67.17%), प्रथम आली. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड. एस. टी. पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक एस. व्ही, मुडपे आणि टी. एन. सगर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.