सताक्षी राठोड चा हाकेतांडा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

रेणापूर (प्रतिनिधि)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेतांडा ता.रेणापूर जि.लातूर येथील माजी विद्यार्थीनी कु. सताक्षी काशिनाथ राठोड या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेतांडा शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून अधिकारी झालेले श्री. संतोष परसराम जाधव, राज्यकर निरीक्षक, GST office (वस्तू व सेवाकर कार्यालय , बार्शी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हाकेतांडा, तालुका रेणापूर. या भौतिक सुविधा नसलेल्या छोट्याशा वस्तीतून या विद्यार्थीनीने प्रचंड कष्ट घेऊन कसल्याही प्रकारचे क्लास किंवा ट्युशन न लावता या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली आहे.सदरील विद्यार्थिनी हे प्रचंड कष्ट आणि स्वतःच्या मेहनतीतून अभ्यास करून हाकेतांडा या तांड्याचं नाव लौकीक केले आहे.
अशा प्रतिभावंत विद्यार्थिनीच भविष्यात आयपीएस घडू शकतात असे गौरव उद्गगार शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले आहे. सदरील विद्यार्थिनीचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सर्व गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार शाळेत करण्यात आला.यासाठी तिच्या या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक म्हणून शाळेतील मुख्याध्यापक श्री सावळकर गणेश,श्री जाकिर शेख या शिक्षकाने प्रचंड मेहनत घेतली व मार्गदर्शन केले आहे. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष त्र्यंबक राठोड, काशिनाथ राठोड,संजय चव्हाण,इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.