छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचे 12वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचे 12वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

उदगीर (प्रतिनिधी)
किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 12 वी बोर्ड 2025 परीक्षेत घवघवीत यश मिळवले. महाविद्यालयाचा एकूण निकाल 91.70 टक्के लागला आहे. विज्ञान विभागाचा 95.73 टक्के ,वाणिज्य विभागाचा 95.55 टक्के, कला विभागाचा 65.62 टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेत विशेष प्रविण्यासह 07 विद्यार्थी व वाणिज्य शाखेत 11 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. तर प्रथम श्रेणीत विज्ञान शाखेचे 26 विद्यार्थी उत्तीर्ण तर वाणिज्य विभागात 190 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण,कला शाखेत 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्राची राजविक्रम बिरादार हिने विज्ञान शाखेत 88.60 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेत 91.67 टक्के गुण घेऊन कलानी आरती प्रेमचंद हिने प्रथम क्रमांक मिळवला. फड नंदिनी, नाईक मुक्ता यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण घेतले.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर , संस्थेचे सचिव पी.टी.शिंदे, सहसचिव हिरागीर सिद्धगीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी, प्राचार्य डॉ रामकिशन मांजरे, पर्यवेक्षक प्रा.आर.पी.गिरी व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!