अल-अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाचा गौरवशाली निकाल – विज्ञान विभाग १००% तर कला विभाग ९०.६७%*

उदगीर (प्रतिनिधी) शहरातील नामांकित उर्दू माध्यमाची शैक्षणिक संस्था अल-अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या बारावी परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या विज्ञान विभागाने पुन्हा एकदा १००% निकाल देत यशाची परंपरा जपली असून, कला विभागानेही ९०.६७% निकाल साधत गुणवत्ता टिकून ठेवली आहे.
विज्ञान शाखेतून शेख़ इफ़रा रहमान हिने ८६% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तिच्यानंतर उस्ताद सुमय्या बेगम ग़यासुद्दीन हिने ८२.६७% गुणांसह दुसरे स्थान मिळवले तर सय्यदा ज़ुबिया तुराब अकरम हिने ८०.३३% गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला. कला विभागात मनियार जोहा इस्माईल हिने ७३.३३% गुण मिळवत विभागात प्रथम क्रमांक मिळवला.
या निकालामध्ये केवळ विद्यार्थ्यांचे परिश्रम नव्हे तर त्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेतील शिस्तबद्ध वातावरण, संस्थेतर्फे केले जाणारे वेळोवेळी मार्गदर्शन आणि पालकांचा सातत्याने मिळालेला पाठिंबा यांचेही मोठे योगदान आहे. अल-अमीन विद्यालयाने केवळ निकालातच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
विद्यालयाचे प्राचार्य ग़ुलाम ग़ौस खान यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अल-अमीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. इसा खान, सचिव शेख मोहम्मद अकबर, सहसचिव हाशमी सलीम आणि कोषाध्यक्ष शेख क़यामोद्दीन यांनीही विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.
अल-अमीन विद्यालयाचा हा निकाल शैक्षणिक क्षेत्रात एक प्रेरणास्थान ठरला असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने पुढे जाणाऱ्या या संस्थेचे कार्य सर्व स्तरांवरून गौरवले जात आहे.